देवगाव देवळीत माळी समाजाचा आदर्श विवाह सोहळा संपन्न

Social कट्टा अमळनेर कट्टा

तहसीलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून पार पाडला समारंभ..

अमळनेर प्रतिनिधी >>तालुक्यातील आदर्शगाव देवगाव देवळी माळी समाजाचा घरगुती वातावरणात तहसिलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला, देवगाव देवळी येथील रहिवाशी भगवान दत्तू महाजन यांची कन्या चि.सौ.का.निकिता व सुरत येथील रहिवाशी गुलाब शेनपडू महाजन यांचे सुपुत्र चि.भाविक यांचा विवाह दि.१४मे रोजी ठरला होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आले.

दोन्हीकडील नातेवाईकांनी मध्यस्थी करत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यामुळे हा विवाह दि. २८ मे रोजी पार पाडण्याचे ठरवण्यात आले.त्यानुसार आज दि.२८ रोजी घरगुती वातावरणात सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ यांनी बोलतांना आवाहन केले की सर्व समाजातील नागरिकांनी ह्या विवाह सोहळ्याचा आदर्श घ्यावा जेणेकरून मुलीचे वडील अथवा मुलाचे वडील यांचा अनावश्यक खर्च वाचेल व त्यातून काही रक्कम समाजपयोगी कामांसाठी उपयोग होईल व खर्च वाचेल कन्येच्या विवाहपोटी अनेक जण कर्जबाजारी होतात व आत्महत्या करतात ही वेळ येणार नाही व दाम्पत्य देखील सुखात राहील असे आवाहन केले.


लग्न समारंभात मुलीचे आई,वडील,भाऊ,काका,काकू,मुलाचे आई,वडील,काका,काकू,तहसिलदार मिलिंद कुमार वाघ , साप्ता.अमळनेर भुषणचे संपादक शिवाजी महाजन, साहेबराव पाटील,भिका माळी,आदी उपस्थित होते या विवाह सोहळ्यास शासकीय अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधूंचे सहकार्य लाभले.

गजानन पाटील,अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *