सामजिक कार्यकर्ते रजनीकांत पाटील यांचा प्रश्न
रिड जळगाव >> महाराष्ट्र भरात बोगस बियाणें विक्री व युरिया लिंकींग संदर्भात कृषी केद्रांवर कारवाई होत असतांना अमळनेर शिरूड येथील शेतकरी रजनिकांत दिलीप पाटिल यांचे शेतात घडलेला प्रकार आचंभित करणारा आहे. आधीच कोरोना सारख्या महा भयंकर आजाराने संपूर्ण जगाला गाठले असून त्यात शेतकरी हा आपला जीव धोक्यात घालून मोठ्या आशेने शेती करत आहे.

कोरोना सारख्या आजाराला लढा देणारा शेतकरी आज स्वतः दिवस रात्र कष्ट करत स्वतः उपाशी राहून जगाला अन्न पुरवत आहे. हे यंदा चे वर्ष पाहता गावात चांगला पाऊस झाल्याने शेतातील पिके व पिकातील गवताचा (तणाचा) प्रादुर्भाव चांगलाच वाढत चालल्याने निंदणी साठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने तसेच मजुरी देखील परवडत नसल्याने शेतकरी विविध कंपनीचे तणनाशक चा वापर करत आहे. मात्र त्यात देखील एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे.
शिरूड येथील दिलीप पाटील यांनी आपल्या ज्वारी च्या पिकासाठी गावातील दुकान गुरुकृपा कृषी सेवा केंद्र वरून ‘सुदाजिन’ हे तणनाशक विकत घेऊन शेतात त्याची फवारणी केली. परंतु 10 दिवस उलटून देखील शेतातील तणावर कुठलाही परिणाम न झाल्याचे जाणवल्याने पाटलांना धक्काच बसला. या बाबत सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत पाटील यांनी कृषी केंद्र चालक मुकेश बडगुजर यांच्या कडे विचारणा केली असता ऊडवा ऊडविची ऊत्तरे दिली.व सदरची माहीती कंपनीला द्यावी असे सांगीतले.
या प्रकारानंतर शिरूड मधील कृषी केंद्रांद्वारे बाजरी व सोयाबीन चे बोगस बियाणे विक्री करुन अनेक शेतकऱ्यांची फसविणूक झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.याची तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी वेळीच दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत पाटिल व शिरुडचे ग्रामस्थ करीत आहेत.