अमळनेरात भावजायीला शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग ; तिच्यासह भावाला आई-वडिलांना मारहाण

अमळनेर क्राईम निषेध

अमळनेर >> भावजयीचा विनयभंग करून तिच्यासह भावाला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना ४ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

माळीवाडा, अमलेश्वर नगरमधील मूळ रहिवासी असलेली व मुंबई येथे राहणारी एक विवाहिता मामांचे निधन झाल्याने अमळनेर येथे आली हाेती.

४ रोजी रात्री महिलेचे जेठाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केला. तसेच महिलेचा पती व त्याचा भाऊ तसेच त्याच्या आई-वडिलांना देखील मारहाण केली.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जेठ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.