पिस्तूल घेऊन जाणाऱ्यांना अमळनेरात पोलिसांनी केली अटक

अमळनेर क्राईम धुळे माझं खान्देश सिटी न्यूज

अमळनेर प्रतिनिधी ::>चोपड्यातून गावठी पिस्तुल घेऊन पळणाऱ्या धुळे तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३५ हजारांचा कट्टा जप्त करण्यात आला.

दोन जण दुचाकीवरून (क्रमांक एमएच.४१.एसी.१८९९) सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा घेऊन पळून जाताना दिसले. यानंतर पोलिसांनी चोपडा रेल्वे गेटपासून आरोपींचा पाठलाग सुरू केला.

दरम्यान, आरोपी अमळनेर शहरातील दगडी दरवाजातून पळत असताना पोलिसांची व्हॅन तेथे अडकली. मात्र, रवी पाटील यांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. यामुळे दोघांची घाबरगुंडी उडून ते दुचाकीवरून खाली पडले. यानंतर पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले. राजेश गणेश गुरखा (रा.शिरूड, ता.धुळे) आणि मलदरसिंग गुरुमुख सिंग शिकलकर (रा.साक्री रोड, धुळे) अशी दोघांची नावे आहेत.

सहायक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सूचनेनुसार एपीआय प्रकाश सदगीर, हवालदार संजय पाटील, सुनील हटकर, दीपक माळी, डॉ.शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, कैलास शिंदे, भूषण बाविस्कर आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपींना पकडले. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
प्रतिनिधी
, गजानन पाटील, अमळनेर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *