अमळनेर :>> तालुक्यातील अमळगाव येथे रात्रीतून एका घरासह तीन दुकानांमध्ये चोरट्यांनी हाथ साफ केल्याची घटना घडली आहे.
दि. ३१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी प्रकाश भोई यांचे लहान भाऊ हे रात्री २:४५ वाजता उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर घरात पाहिले असता गोदरेज कपाट फोडून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, १२ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या, लहान मुलांच्या गल्ल्यातील २ हजार रुपये असा ३४ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
तसेच शेजारी राहणारे मालुबाई बन्सी भोई, बस स्टँड वरील हरेंद्र नरेंद्र पाटील यांचे दुकान व प्रशांत वाल्हे यांच्याकडे ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पी एस आय किशोर पाटील हे करीत आहेत.