अमळनेरातील भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये लवकरच प्रवेश करणार

Politicalकट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर प्रतिनिधी ::>माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केल्यानंतर अमळनेर तालुक्यातील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी देखील राष्ट्रवादीत जाण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, माजी तालुकाध्यक्ष भरतसिंग पाटील, पारोळा तालुका भाजपचे माजी अध्यक्ष तथा अमळनेर तालुक्यातील माजी जि.प.सदस्य अशोक हिंमत पाटील, माजी जि.प.सदस्य विनायक बिरारी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर पं.स.चे माजी सभापती डॉ.दीपक पाटील यांनी भाजपला कंटाळून खडसेंासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.