चोपडा-अडावदला पावसाचा शिडकाव, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

अडावद चोपडा सिटी न्यूज

अडावद प्रतिनिधी >> अडावद (ता. चोपडा) परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. यामुळे काढणीवर आलेला मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

अडावद परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी ७ वाजता तुरळक स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताच मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली. दरम्यान, यंदा अतिपावसामुळे तसेच रोगराईमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

जिन मालकांची धावपळ
चोपडा >> दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी साडेसहा वाजता चोपडा शहरात अल्प पाऊस झाला. यामुळे शहरातील जिन मालकांची धावपळ उडाली. सध्या सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. केंद्रावरील कापूस ओला होवू नये यासाठी मजुरांनी उपाय केले. यावल रोडवरील सुनील जैन यांच्या हिरा कॉटन जिनिंगमध्ये कापसाचे ढिगारे पाल टाकून झाकण्यात आले.