माजी मंत्री महाजन यांच्या गाडीला धडक देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

Politicalकट्टा कट्टा पाचोरा

रिड जळगाव प्रतिनिधी ::> माजी मंत्र्यांच्या गाडीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वार आरोग्य सहाय्यकाचा उपचार सुरु असताना सहाव्या दिवशी मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यावर त्यांच्या मूळ चोपडा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाची दुचाकी माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या चारचाकी वाहनावर धडकली होती. यात आरोग्य सहाय्यक भाऊसाहेब गोविंदा पवार हे गंभीर जखमी झाले होते.

जळगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. मृत कर्मचाऱ्यावर त्यांच्या मूळ गावी चोपडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी दुपारी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या खासगी वाहनातून पाचोरा येथून जामनेरकडे जात होते. त्याचवेळी वरखेडी आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सहाय्यक भाऊसाहेब गोविंदा पवार हे दुचाकीवरून वरखेडीला जात होते. आर्वे फाट्याजवळ आमदार महाजनांच्या वाहनाला धडकले होते. पवारांची शनिवारी पहाटेपर्यंत मृत्यूशी तब्बल ६ दिवस सुरु असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *