भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत.

दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची 3 ते चार वाहने आहेत ते भाडोत्री देऊन त्याचा चरीतार्थ चालत असे धुळे येथिल नेर कुसूंबा येथे लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोघे मोटरसायकलने गेले होते. तिकडून परत येत असतांना समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकने त्यांना समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात किरण मिलिंद मोरे व पंकज येवले दोघे जागीच ठार झाली.

अपघात घडल्यावर ट्रकने मारोती ब्रेझा आणि बैलगाडी देखिल उडवल्याचे कळते.अपघाताची महिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रकच्या खाली आलेल्या दोघांचे मृतदेह जेसीबी मागवून काढण्यात आली जमावाचा रोष पहाता पोलिसानी चालकाला लागलीच ताब्यात घेतलं आणि पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *