दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण ; गुन्हा दाखल

क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

प्रतिनिधी धुळे >> शहरातील रामदेव बाबा चौक व शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रूक येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले.

शहरातील रामदेव बाबा नगर परिसरातील निशांत चौकात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर रईस निजामोद्दीन रंगरेज याचे नाव पुढे आले.

पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यावरून आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रूक गावातून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली.

ती साबुदाणा घेण्यासाठी किराणा दुकानात गेली होती. त्यानंतर परतली नाही. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार नरडाण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.