१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

क्राईम धुळे माझं खान्देश साक्री

धुळे ::> साक्री तालुक्यातील मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने एकावर संशय व्यक्त केला आहे.

मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. एटीडीचा अर्ज भरण्यासाठी जाते असे कारण सांगून ती घराबाहेर पडली होती.

केतन उत्तम पानपाटील याच्या मोटारसायकलवरून जाताना पीडित मुलीला तिच्या काकांनी बघितले. त्यावरून केतन पानपाटील याच्या विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.