जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Jalgaon जळगाव

जळगाव >> जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.

मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, पूर्व परवानगीशिवाय सभा घेणे, मिरवणूक काढण्यास बंदी आहे.

हा आदेश वृद्ध, अपंग व्यक्तींना तसेच शासकीय कार्यक्रम, लग्न मिरवणूका, धार्मिक मिरवणुका व प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही, असे अपर जिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सांगितले.