२२ वर्षीय तरुणाची विषारी द्रव पदार्थ सेवन केल्याने मृत्यू

आत्महत्या क्राईम पारोळा

पारोळा >> तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर कैलास भिल वय २२ या तरुणाने विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून अस्क्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील ज्ञानेश्‍वर कैलास भिल हा मोल मजुरी करीत असायचा. शुक्रवारी ज्ञानेश्वर भिल हा घरी बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला तर परत आला नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. अशातच रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तो एका सार्वजनिक मुतारी जवळ हात पाय झटकत असल्याचा निरोप त्याच्या वडिलांना मिळाला. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता. पुढील उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी तो उपचार सुरू असतांना मृत पावला. याबाबत वडील कैलास भिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.