जळगावात २० वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> शहरातील मोहन टॉकीज कीज भागातील कृष्णा भीमा आरशूल (वय २०) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कृष्णा हा आई वडीलांसह मोहन टॉकीज भागात वास्तव्यास होता. तो कुटुंबियांसोबत चौबे शाळेजवळ भाजीपाला विकून उदनिर्वाह करायचा. अचानक त्याने रात्री ११ वाजेच्या सुमारास घरातील छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हे पाहून आईने हंबरडा फोडला. नागरिकांनी तत्काळ त्याला देवकर महाविद्यालयातील आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *