साकळीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा फज्जा

यावल

साकळी/ प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून गावातील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व तसेच ग्राहकांची सकाळ-संध्याकाळी गर्दी होत असते. अशावेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे चित्र असते. गावातील नागरिक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळी नको ती गर्दी करत असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असताना साकळीत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. तसेच गावातील काही ठिकाणी रात्रीच्या १० वाजेनंतर किराणा दुकान सुरु असल्याचे ही दिसून आले आहे. मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साकळीतील आयडीबीआय बँकेसमोर खातेधारकांची गर्दी…

तसेच गावातील आयडीबीआय बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात असून बँकेने कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बँकेच्या परिसरात खातेधारकांची मोठी गर्दी होत असून बँक अधिकारी कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्सिंगचे चौकट न आखता सर्हास गर्दी होत आहे. सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असताना बँक अधिकारी व खातेधारकांनी कोणत्याही प्रकारचे पालन करत नसल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *