औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांना आर्थिक सहकार्य देण्याकरीता संघर्ष वाहन चालक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
सध्या जगभर चालू असलेल्यां कोविड-19(कोरोना विषाणू) या रोगामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असल्यां कारणाने महाराष्ट्रातील सर्व वाहन चालक घरीच बसून आहेत. त्यामुळे या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि या भयंकर संकटामुळे, पोटाचं साधन बंद असल्याकारणाने, पैठण येथील शिवाजी देशमुख या वाहन चालकाने फायनान्स कंपनीच्या त्रासालां कंटाळून आणि परिवाराचां उदरनिर्वाह न करू शकल्याने आत्महत्या केली.
महाराष्ट्रातील वाहन चालक हे अत्यंत गरीब परिस्थितीत जिवन जगत आहेत. सर्व हातावर पोट भरणारे आहेत. गाडीला जर भाडे मिळाले तर, त्यांच्या घरी चूल पेटते. नाहीच भाडे भेटले तर, उपाशी झोपण्याची सुद्धां तयारी असणाऱ्यां वाहन चालकांना मागील 50 दिवसापासून लॉकडाऊनमुळे एक रुपयाही कमवता आला नाही,त्यामुळे त्यांचे परिवार खूप हलाखीचे जीवन जगत आहेत. यांचा प्रशासनाने विचार करावां याकरीता संघर्ष वाहन चालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यां वतीने मराठवाडा अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना निवेदन दिले.