शिरसोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम शिरसोली


जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. गावातील बारी नगरातील रहिवाशी प्रवीण पांडूरंग खलसे ( बारी) या ३७ वर्षीय तरुणाने आज दुपारी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण बारी महावितरणला नोकरीला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही, त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

प्रवीण खलसे (बारी) यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *