विद्यापीठाचे कामकाज १७ मे पर्यंत असणार बंद

माझं खान्देश

जळगाव : लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कामकाज देखील याच तारखेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती एका पत्रकान्वये देण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था बंदचा कालावधी येत्या १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या काळात सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामकाज करावीत, असे निर्देश देण्यात आले आहे.

प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी रविवार ३ मे रोजी परिपत्रक काढले असून त्यामध्ये १७ मे पर्यंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरी राहून काम करावे असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ३ मे पर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश होते. परंतु भारत सरकार व महाराष्ट्र शासनच्या काल प्राप्त झालेल्या आदेशान्वये कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठातील प्रशासकीय विभाग/ प्रशाळा/ वसतिगृहे तसेच अमळनेर, धुळे व नंदुरबार येथील उपकेंद्र १७ मे पर्यंत बंद राहतील तसेच महाविद्यालये देखील या काळात बंद राहतील. या बंदच्या काळात घरी राहून संबधित विभागाचे कामकाज करावे. आवश्यकता वाटल्यास वरिष्ठांच्या आदेशान्वये गरजेनुसार कार्यालयात उपस्थिती बंधनकारक राहील असेही परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *