लॉकडाऊनच्या कालावधीत नवापुर शहरात अवैध मद्यसाठा जप्त

क्राईम नंदुरबार नवापूर माझं खान्देश

प्रकाश खैरनार
नवापूर – 06 मे रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाची SKODA FABIAगाडी क्र. MH.39 D 751 या गाडीत दारुची वाहतुक होत असुन सदरची कार ही गुजरात राज्यात जात आहे.

अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सपोनि/धिरज महाजन यांना गावात पेट्रोलींग करुन सदर कारचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने सपोनि/धिरज महाजन सोबत पोकाँ/आदिनाथ गोसावी, पोकाँ/दिनेश बाविस्कर, पोकाँ/शाम पेंढारे, पोकॉ/योगेश साळवे, चापोना/महेश पवार असे नवापुर गावात पेट्रोलींग करत असतांना पांढऱ्या रंगाची SKODA FABIAगाडी क्र. MH.39 D 751 ही दिसली असता सदर कारला थांबविण्याचा इशारा केला असता ती गावातील नयाहोन्डा पुलाकडे पळुन गेली. तेव्हा सपोनि/धिरज महाजन यांनी ग्रामरक्षक दलाचे सदस्य यांना सदर गाडी थांबविणेबाबत फोनद्वारे सांगीतले व सदर वाहनाचा पाठलाग केला दरम्यान सदर कारच्या चालकाने वाहन नयोहोन्डा ते करंजी जाणाऱ्या रोडवर थांबवुन वाहन सोडुन पळुन गेला, सदर वाहनाची तपासणी करता तिचेत 33,600/- रु. किं.ची DSP Black नावाची विदेशी दारु, 62,400/- रु. किं.ची देशी दारु असा गाडीसंह एकुण किंमत 3,56,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर कारवरील चालक सदरची कार सोडुन पळुन गेला असल्याने गाडीमालक याचा तपास केला असता सदरची कार ही नितीन ठक्कर या इसमाची असल्याची माहीती मिळाल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास सपोनि/धिरज महाजन हे करीत आहेत.

सदरच्या कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री. महेंद्र पंडीत, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत गवळी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सपोनि/धिरज महाजन संह पोकाँ/आदिनाथ गोसावी, पोकाँ/दिनेश बाविस्कर, पोकाँ/शाम पेंढारे, चापोना/महेश पवार,पोकॉ/योगेश साळवे इ. कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *