राजकारण नेमके करायचे कोणी?

Politicalकट्टा

संमेलनात राजकारण नको….!!!

हर्षल सोनार, जळगाव

मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. ग्रंथ प्रचाराला चालना मिळावी, नवसाहित्य वाचकापुढे याव यासाठी तो दरवर्षी साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासुन यात राजकारण्यांना व्यासपीठावर स्थान देऊन वर्षानुवर्ष साहित्याची अहोरात्र सेवा करणार्‍या साहित्यिकांचा तो अपमान ठरतो. हा उत्सव साहित्यिकांचा असल्याने यांत फक्त ज्या लेखकांनी आपले आयुष्य साहित्याची सेवा करण्यात खर्ची घातले आहे. त्यांनाच व्यासपीठावर स्थान देवुन व्यासपीठ गौरान्वित करावे. राजकारण्यांना तर सर्वीकडे चमकोगिरी करायची असते. त्यांना जर चमकोगिरी करायची असेल तर त्यांनी राजकारण्यांचे साहीत्य संमेलन ठेवुन आपली हौस खुशाल भागवावी….

१) विद्यार्थ्यांनी राजकारण करू नये, शिक्षणावर लक्ष द्यावे.

२) सरकारी नोकरदारांनी राजकीय मते व्यक्त करू नयेत, सेवाशर्तींचा भंग होतो.

३) खासगी नोकरीत असलेल्यांनी राजकारणावर बोलू नये, कधीही नोकरी जाऊ शकते.

४) टॅक्सपेयर्स आणि उद्योजकांनीही राजकारणापासून लांब राहावे, आणि आपले काम करावे.

५) सुशिक्षित लोकांनी राजकारण करू नये, उगीच स्वतःच्या करिअरची माती!

६) संसारी लोकांनी राजकारणात पडू नये, कारण बायका-नवरे आणि पोरांना उगीच त्रास!

राजकारण करावं फक्त बायको सोडून दिलेल्या, गेमाडपंथी, चड्डीधारी, अडाणचोट, रिकामटेकड्या सोंडक्यांनी!
राजकारण म्हणजे जणू काय गावातला बस स्टँड झालाय की तिथे हे असले देवाला सोडलेले वळू पोसायचे आहेत?
लक्षात ठेवा, तुम्ही राजकारणापासून जर लांब पळालात, तर असलेच अडाणी तुमच्या नशिबी येऊन तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नशिबाला कायमचा घोडा लावणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *