बहु प्रतीक्षेनंतर पाचोरेकरांसाठी समाधान कारक अहवाल
पाचोरा :- पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात राहणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा कोरोना अहवाल अखेर निगेटीव्ह आला आहे. या अहवालासाठी पाचोरेकर नागरीक प्रतीक्षेत होते. विविध दवाखाने प्रतिष्ठानमध्ये चहा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या चहावाल्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूकडे घुबड रुग्ण म्हणून संशयाने पाहिले जात होते. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पाचोरेकरांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. याबाबत वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान नागरिकांनी लॉक डाऊन चे पालन करत फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.