तीन दांडीबहाद्दर पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव माझं खान्देश

जळगाव : कोविड-१९ या साथरोगाचा प्रादुर्भाव सर्व ठिकाणी जलद गतीने पसरत असतांना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा व सुव्यस्थेची महत्वाची जबाबदारी दिलेली असतांना पुर्वपरवानगी न घेता परस्पर निघुन गेल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांनी मालेगाव येथे विविध ठिकाणी बंदोबस्त लावला होता. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून ११० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवले आहेत. त्यापैकी ६ पोलिस कर्मचारी हे त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर असल्याबाबत नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी जळगाव पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे अहवाल पाठवला होता.

त्याप्रमाणे निलंबित करण्यात आलेल्या तिघांसह जळगाव पोलिस मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी, शनिपेठ पोलिस ठाण्याचे राहुल पाटील व राहुल घेटे हे कर्तव्यावर गैरहजर असल्याचे कळवले होते. या प्रकरणी पोलिस अधीक्षक उगले यांनी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे चौकशी दिली होती. चौकशी अंती तिघही पोलिस दोषी आढळून आले. त्यानूसार पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची शिक्षा दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *