ट्रकमधून युपीत निघालेल्या ४५ मजुरांना जळगावात घेतले ताब्यात

जळगाव

जळगाव: नाशिक येथून आपल्या गावाकडे पायी प्रवास करून नंतर एका ट्रकद्वारे आपल्या घराकडे जाणाऱ्या ४५ मजुरांना जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना क्वारंटाईनसाठी ठेवण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पथक आज महामार्गावर गस्त असतांना एक ट्रक संशयित जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून प्रभात चौकात पकडला. यात ४५ परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक येथून पायी चालत असतांना पुढे जाण्यासाठी ते ट्रकमध्ये बसले होते. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सर्व मजूर नाशिक येथून उत्तरप्रदेशात आपापल्या गावाकडे जात असल्याचे समजले.

दरम्यान मजूरांपैकी कोणाकडेही परराज्यात जाण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी खबरदारी म्हणून सर्वांतना तातडीने जिल्हा कोवीड रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *