जामनेर शिवारात गावठी हातभट्टीवर छापा : 22 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राईम जामनेर

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : जामनेर पोलिस ठाणे हद्दीतील जामनेर-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल विशालच्या पलीकडे टेकडी जवळ जामनेर शिवारात कलीम मिस्तरी यांच्या मालकीचे शेताच्या बांधावर संशयीत आरोपी विजय बंडू मोरे (रा.खडकी, ता. जामनेर) व सचिन संतोष बोरसे (रा.जामनेर पुरा, जामनेर) हे गावठी हातभट्टी तयार करीत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली.

आरोपींच्या ताब्यातून एक हजार 500 रुपये किंमतीची तयार गावठी दारू तसेच चार हजार 500 रुपये किंमतीचे 150 लिटर तयार रसायन तसेच 16 हजार रुपये किंमतीचे 800 लिटर रसायन मिळून 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *