चोपडा कृषि कार्यालयातर्फे शेतक-यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचविण्यात येणार

चोपडा सिटी न्यूज


जळगाव : तालुका कृषि अधिकारी कार्यालय, चोपडा व बळीराजा सिडस, चोपडा यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेतक-यांसाठी बांधावर कृषि निविष्ठा पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चोपडा कृषि कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरीप हंगामात कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होऊ नये. त्यांच्या सुरक्षिततेसाठी चोपडा तालुका व परिसरातील शेतक-यांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. शेतक-यांना आपल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गटांकडे अथवा 7798567571 / 9421376386 / 9356608181 / 9356623711 या संपर्क क्रमांकावर संपर्क करुन आपल्याला हव्या असलेल्या कृषि निविष्ठांची नोंदणी करता येईल.

निविष्ठांच्या किंमतीबाबत सर्व माहिती, तसेच कृषि विषयक तात्रिक सल्ला देखील संपर्क क्रमाकांवर उपलब्ध असेल. कृषि निविष्ठा, बी-बियाणे, खते बांधापर्यत घरपोच देण्याची सेवा ही बळीराजा सिडस, चोपडा यांच्याकडून विनामुल्य असणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच कापूस बियाणाची लागवड जून महिन्यातच करावी. असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, चोपडा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *