चुंचाळे येथील माहेरवाशिनीने केले गरजुंना धान्य वाटप

Social कट्टा कट्टा यावल

चुंचाळे ता.यावल(वार्ताहर) ‘कोरोना ‘ संसर्गिक आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात गरीब व मजूर लोकांचे खूप हाल होत आहे. त्यांच्या हाताला कामे नसल्यामुळे जवळ पैसे नसल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण बनले आहे. तेव्हा मानवतेच्या भावनेतून गरीब व गरजू लोकांना आता मदतीची व मानसिक आधाराची गरज आहे.

ही गरज ओळखत चुंचाळे येथील आराध्य दैवत श्री समर्थ रघुनाथ बाबा व वासुदेव बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधत चुंचाळे ता.यावल येथील बाजिराव गंगाराम पाटील यांची मुलगी जळगाव एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन मध्ये पो.काँन्सटेबल भावना पाटील यांनी दि.४ मे व ५ मे रोजी दोन दिवस आपल्या गुरुची पुण्यतिथी सोहळ्याचे औचित साधत चुंचाळे व गायराण मधील गरजू लोकांना स्वखर्चातून मदत केली.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले गायराण या आदिवासी वस्तीतील व गावातील गरिब व गरजूना तिनशे किलो गव्हाचे व तिनशे किलो तांदुळाचे तसेच शंबर किलो तेलाचे वाटप केले अजून काही गरजु कुंटूबास धान्य द्यायचे असल्याचे भावना पाटील यांनी सांगितले यावेळी कुंटूबातील बाजिराव पाटील (वडील), कल्पना पाटील (आई), छोटु पाटील (काका), सपना पाटील (काकु) पियुष पाटील (भाऊ),माही (बहीन)मानसी (मुलगी) पत्रकार प्रकाश चौधरी,ज्ञानेश्वर कोळी,पप्पु पाटील,ज्ञानेश्वर राजपूत,दिपक नेवे,डिगबंर साळुखे,महेश पाटील (दादु)उपस्थित होते मित्रपरिवाराच्या हातून सदर चुंचाळे व गायराण भागातील नागरिकांना धान्याचे घरपोच वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *