‘गो बॅक मोदी’ म्हणणाऱ्यांना विधानपरिषदेत संधी : माजी मंत्री खडसे

Politicalकट्टा कट्टा

विधान परिषद: पंकजा मुंडे, खडसेंना संधी नाही, भाजप यादीत नव्या नेत्यांना तिकिटं

भाजपची विधान परिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.

पण पक्षातले ज्येष्ठ नेते आणि इच्छुक एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी विधान परिषदेत जाता येणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले: “माझी इच्छा होती. मी विनंतीही केली होती. पण आता पक्षाने निर्णय घेतलाय. जुने नेते डावलून पडळकरांसारख्या व्यक्तीला संधी दिली आहे. त्यांनी गो बॅक मोदी म्हटलं होतं लोकसभेत. मी नाराज तर आहेच. मी पक्षश्रेष्ठींकडे माझी नाराजी व्यक्त केली. यामुळे वर्षानुवर्षं काम केलेले निष्ठावान नाउमेद होतात. माधव भंडारी आहेत, पंकजा मुंडे आहेत, असे अनेक नेते आहेत. दुःख वाटतं, पण पक्षाचा निर्णय झाला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर्स आहेत. पण मी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याचं यापूर्वी टाळलं होतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *