किरकोळ कारणावरून दोन कुटुंबाच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

क्राईम यावल सिटी न्यूज

यावल : तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत मंगलाबाई युवराज न्हावी (वय ४८) या महिलेला जोरदार मार लागल्याने यावल येथे उपचारार्थ आणत असताना उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

सायंकाळी आडगाव येथील दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. यात मंगलाबाई न्हावी यांना जोरदार मार लागल्याने त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबाच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पो. नि. अरूण धनवडे व सहकाऱ्यानी तातडीने आडगावला जावून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन महिलांसह दगडू खंडू कोळी, विनोद दगडू कोळी, सागर दगडू कोळी या संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद मयत महिलेच्या मुलाने दिली. त्यावरून येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *