एकनाथराव खडसे पतसंस्था संचालकांवर कारवाई करा ; जिल्हाधिकारी राऊत यांना ठेवीदारांचे साकडे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा क्राईम जळगाव जळगाव जिल्हा भुसावळ वरणगाव

जळगाव >> वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या, संबंधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. प्रकाश चौधरी, यादव जगन्नाथ पाटील यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी हे निवेदन दिले.

पतसंस्थेत ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. संस्थेचे चेअरमन व पदाधिकारी यांनी ठेवी पावत्यांची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत दिलेली नाही. जाणीवपूर्वक ही रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून येत आहे. ही पतसंस्था सहकारी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेली असून जिल्हाधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण असते.

रिक्षाचालक यादव जगन्नाथ पाटील यांनी या पतसंस्थेत ठेव रक्कम तसेच बचत खात्यात मुलीच्या नावे रक्कम ठेवलेली आहे. त्या ठेव पावत्यांची मुदत संपलेली आहे. ज्ञानदेव भंगाळे हे वयोवृद्ध असून त्यांनी धनवर्धिनी पतसंस्थेत बचत खाते उघडलेले आहे. त्या बचत खात्यात ९४ हजारांवर रक्कम आहे. त्यांना ही रक्कम वृद्धापकाळात औषधोपचारासाठीही देण्यात येत नाहीत. त्यामुळे चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.