उन्हाची चाहूल लागताच मंदिराच्या आवारात केली पक्षासाठी चारा पाण्याची सोय…

Social कट्टा यावल

नयन नेवे यांच्या वाढदिवसा निमीत्त गावात जलपात्रे वाटप श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन कडून पक्षी व वृक्ष संवर्धनाचा संदेश


चुंचाळे : चुंचाळे (ता.यावल) सुनिल नेवे एकता फाऊंडेशन च्या वतीने चि.नयन नेवे याचा दि. ८ मे रोजी वाढदिवस घरी साजरा न करता त्या पैशातुन श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिरात व गावात पक्षांची तहान भागवण्यासाठी गावात जवळपास दोनशे जलपात्रे देऊन पक्षाची तहान भागणार आहे, याबाबत पशु पक्षांसाठी असलेली दाना -पाण्याची व्यवस्था करून भूतदयेचा एक छोटासा संदेश देण्याचे काम केले आहे.


मार्च महिना सुरु झाला की उन्हाची चाहूल लागते. पशू पक्षांची अन्न पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता आणि पर्यावरण संवर्धनासाठी पशु पक्षांना मंदिराच्या आवारात पाणी ठेवत हा उपक्रम राबवला आहे.


नयन भाऊ मित्र परीवाराकडून शाळेत, वडाच्या झाडावर , गावात, शक्य होईल तिथे चिऊ साठी दानापाणी ठेऊन हा उपक्रम राबविनार असल्याचे म्हटले.


दिवसेंदिवस पशूपक्षांची संख्या कमी होत चालली आहे व याचे कारण म्हणजे वृक्षतोड असून मानवाने आपल्या कौशल्याच्या सहाय्याने खुप प्रगती केली परंतु या प्रगतीमुळे पर्यावरणाचे संतुलन देखील ढासळला आहे.

परिणामी निसर्गात वास्तव्य करणाऱ्या निष्पाप पशू पक्षी यांची संख्या कमी होत चालली आहे. याचा विचार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तसेच सामाजिक वणीकरण अंतर्गत लागवड केलेल्या झाडाना नयन नेवे यांनी टँकरद्वारे पाणी दिले हाच विचार श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन च्या सदस्यानी आत्मसात करुण चि.नयन नेवे यांचा वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *